About Me

Mr. Vitthal G Kirdat

Mr. Vitthal G Kirdat

 

मनोगत

“जागतिक वारसा” स्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या “कास पुष्प पठार” “KAAS PATHAR” या कास पठारावर वाढती लोकप्रियता लक्ष्यात घेत पठाराचे संरक्षण, संगोपन व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.

कास पठार हे “UNESCO World Natural Heritage Site” कमिटीने जुलै २०१२ मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील ३९ ठिकाणांपैकी एक अहे. कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे व त्याचे संवर्धन करणे आपणा सर्वांचे कर्त्यव्य आहे.

मी एक स्थानिक कास गाव मधील रहिवाशी आहे. गेली ३०वर्षे मी इथे कास पठारावर फुले पहतोय. ती इवली इवली फुले का असेनात, अगदी नाखांयेवढी; त्यांच्यातही तितकाच सौंदर्य असत. त्यांचातही तितकीच जगण्याची ओढ असते. त्यांच्या निरीक्षणामध्ये तितकाच थरार असतो ! फक्त आपल्या कडे नजर मात्र हवी !

आपल्या जवळचा हा निसर्ग ठेवा, हे निसर्गाचा दान “पुष्प पठार कास” अगदी साताऱ्याची परसबागच म्हणा ना !

तिकडे उत्तर भारतात “Vally of Flower”
तसं इकडे दक्षिणेत “Plateau of Flowers”

किती फूलं ! हर तऱ्हेची, हर रंगाची !

प्रत्येक छोट फुल सुद्धा निसर्गाच एक महाकाव्य असत. हे काव्य तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण वाचवू या. अनेक फुल तुमच्या साठी आतुरलेली आहेत. या पुष्प पठाराला समजून तरी घेऊ या !

कास गाव हे ब्रिटीश काळापासून पप्रसिद्ध आहे. कास गाव चे पूर्ववसन १९०५ साली झाले असून हे छोटेशे खेडेगांव आहे. कास गावाची लोकसंख्या जवळपास ५०० च्या वर आहे. हे जावली तालुक्यातील सातारा जील्ह्यामध्ये वसलेले आहे. ह्याच गावाच्या हद्दीत कास पुष्प पठार आहे. कास पठाराच्या जूला घनदाट जंगल असून परिसरात कास तलाव, ३०० मी. खोल असा कास वाजराई धबधबा आहे, श्री. कासाई देवी प्राचीन मंदिर, तसेच प्रसिद्ध श्री. घाटाई देवी मंदिर, त्यापलिकडे वासोटा किल्ला व बामणोली बोट क्लब आहे.

कास सरोवर तलाव हे उरमोडी नदीचा उगम आहे. येधुनच सातारा शहराला पुरवठा करणारी यंत्रणा गेली १०० वर्षाहून अधिक सन १९०५ पासून अनाहत पणे चालू आहे. कोणत्याही कृत्रिम उर्जेचा वापर न करता केवळ गुरुत्वाकर्षण आणि तीन ठिकाणी “सायफन” पद्धतीचा वापर करून पाणी २०-२५ कि.मी. अंतरावरील सातारा शहरात आणले आहे.

कास हे नाव श्री. कासाई देवी ह्या ग्रामदेवतेवरून दिलेले आहे. तसे पाहिले तर छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या काळात सुद्धा कस गाव प्रसिद्ध होते. कारण येथूनच कास पठारावरून महाराजांचा महाबळेश्वर-कास पठार-सज्जनगड असा राजमार्ग आहे हे तेवगाच सत्य अहे.

कास पठार व परिसरातील एकूण १९७२. हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. कासपठाराची समुद्र सपाटीपासून उंची १२१३ मी. आहे. येथील पर्जन्यमान हे अंदाजे ३५०० ते ४००० मि.मी. आहे. पर्जन्याकाळ जून ते ऑक्टोबर असतो.

हे पठार कातळ खडकाचे असून, माती व अन्न द्रव कमी प्रमाणात आहे. कास पठार परिसरात प्रदेशनिष्ठ, दुर्मीळ व अति दुर्मिळ वनस्पती आहेत. कास पठारावर ४० प्रकारच्या फुलांच्या प्रजाती आढळतात.

कास पठार हे “UNESCO World Natural Heritage Site” असल्यामुळे दरवर्षी फुलांच्या हंगामा मध्ये (जून ते ऑक्टोबर) जवळपास ३ लाख ते ५ लाख पर्यटक पठाराला भेट देतात.

म्हणूनच मी त्यांच्या सोईसाठी थोडक्या होईना प्रमाणात, संयुक्त वन व्यवस्थापन समिती कास-वन विभाग सातारा यांच्या अंतर्गत “कास पुष्प यात्री निवास” हे घरगुती राहण्याची सोय केली आहे. आणि येथील प्रत्येक स्थानिक असा काहीतरी उद्योग करेल आशी अशा बाळगतो. कारण कास पठारावर येणारा प्रत्येक पर्यटक जवळच्या शहरामध्ये हॉटेल मध्ये राहतात.

कास मध्येच KAAS HOTEL सोय झाल्यामुळे पर्यटकांनाही अल्पदारात राहता येईल व स्थानिक लोकांनाही रोजगार मिळेल. मी स्थानिकांना एक आव्हान देत आहे कि आपण सर्वांनी पर्यटकांसाठी सोई उपलब्ध करून आपली आपण रोजगार निर्मिती करून विकसित करू !

धन्यवाद !

For More details contact Kaas pathar Village Resort and Kaas Hotel:-

Vitthal G Kirdat
Mob. No:- 8291008666, 9594934666




2 comments to About Me

  • english  says:

    Please get the language Corrected on your website. grammar is very bad

    • kashol62  says:

      Thnx for the comment. U understood my language then why its needs to be corrected ??

Leave a reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>